निसर्गाचा खेळ हा फक्त समुद्रकाठी , जंगलात नसून माळरानावरही तितकाच सुंदर असतो . येथील सूर्योदय , सूर्यास्त , दुपारचे रखरखते ऊन, झोडपणारा पाऊस, अवखळ जारा, वाऱ्यावर डोलणारी रानफुले, गार वारा, वन्यप्राणी तुम्हाला निश्चितच जिवंत करतील. लांबच लांब डोंगराळ पठारावर दिसणारी खुरटी झाडे , लांबणाऱ्या सावल्या , मेंढ्या , कुत्री , घोडी आणि या भूमीवर राज्य करणारा धनगर राजा. आयुष्यात समृद्ध करून जाणारे काही दिवस आम्हाला येथे अनुभवायला मिळाले . बिरोबाची जत्रा , घोड्यांच्या शर्यती , रात्री देवळाजवळील नृत्य , गावजेवण, जत्रा , लहान मुलांच्या चेहऱ्यावरील हसू आणि माळरानावरचे खेळ , सकाळी सकाळी भाकरी आणि दुधाचा नाश्ता , शेळ्या मेंढ्यांच्या मागे धावणारी मुले , दुपारचे राखराखते ऊन तरी पाठीचा कणा ताठ आणि स्वाभिमान सदैव जगता असणारी लोक.
परंपरा, कला यांना सोबत घेऊन बदलत्या काळाला समोर जाणारे लोक. वर्षानुवर्षे निसर्गात एकरूप होऊन आलेले शहाणपण क्वचितच एखाद्या पुस्तकात मिळेल. म्हणूनच एक सफर धनगर राजासोबत.
Comments