top of page
  • Writer's pictureYogesh Kardile

मरणाशी संवाद | मरहट्टा



कोण म्हणतो सौंदर्य फक्त जीवनात असते ? ते तर प्रलयात, शिव तांडव, आणि मृत्यूच्या मुखात तलवारीचे नर्तन करणाऱ्या मराठ्यांच्या हौतात्म्यात देखील असते. जणू साक्षात नटराज योध्याच्या रूपात नृत्य करीत रक्त शिंपीत असतो. भवानीचा हा सुपुत्र मरणात अमर होताना पुन्हा या मातीतूनच उठण्यासाठी मरणाचे दान मागीत त्या यमराजाची उराउरी भेट घेतो. कोण म्हणतो मृत्यू हा दारुण असतो. तो तर एक दरवाजा असतो. आपल्या केलेल्या कर्मांना संपवीत प्रत्येक क्षण जिवंतपणे तो दरवाजा उघड्या डोळ्यांनी हा वीर पाहतो. शय्येवर झोपलेला मृत्यू खचितच सुंदर असेल. परंतु रणांगणावरील योध्याचा मृत्यू हजारोंच्या मनामध्ये ठिणगी पेटवून जाणारा असतो. कोण म्हणतो मृत्यूमध्ये मूर्च्छा असते ? योग्यांचे चक्रभेदन आणि योध्याच्या अंगावरील घाव त्या असीमित उर्जेला जागृतपणे पंचतत्वात विलीन करतात. सोहंम वर केंद्रित झालेला श्वास आणि तलवारीला तालावर फिरवीत स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारा योद्धा दोघेही मानवी अस्तित्वाचे परिपूर्ण रूप असतात.



लेख आणि छायाचित्र : योगेश कर्डीले

मॉडेल : आकाश आवटे

रिटचिंग : यतीन शिंदे

भाला : रुद्रा आर्टस् अँड हॅंडिक्राफ्ट्स

मार्गदर्शन ; शिवाजीराजे मर्दानी आखाडा, पुणे

52 views0 comments
bottom of page