बऱ्याच दिवसांच्या अंतराने आम्ही तुम्हाला नवीन पोस्ट रुपाने भेटत आहोत. कदाचित तुमच्या लक्षात आले असेलही पेजचे नाव म्युझ अँड मिरर ऐवजी भारत ट्रेल्स झालेय. खरेतर गेल्या अनेक वर्षांपासून मी आणि रागिणी सह्याद्री, हिमालय आणि एकंदर भारत भ्रमंती करीत म्युझ अँड मिरर नावाखाली प्रवासातील फोटो तुमच्याशी शेअर करीत होतो. आमचा दोघांचा स्वान्तसुखाय प्रवास त्या माध्यमातून अनेकांशी जोडला गेला. उद्देश इतकाच कि आपल्याला आवडणारे कार्य कलेच्या माध्यमातून पुढे नेण्याचे.
सोबतच आम्हाला सह्याद्रीतील पश्चिम घाटातील शेतकरी आणि आदिवासी तरुणांसह पर्यावरणीय प्रकल्पांवर काम करण्याचे भाग्य आम्हाला प्राप्त झाले. त्यामुळे आम्ही शेकडो स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना आपला देश आमच्या नजरेतून दाखविण्याची संधी मिळाली. फोटोग्राफी टूर्स, ट्रेक्स, निसर्ग पर्यटन , कॅम्पस आयोजित केले. अधेमधे प्रकाशचित्रांची प्रदर्शने देखील झाली. मग ते भारतीय वास्तुकला, निसर्ग, वन्य जीवन, रानफुले, एथनिक फॅशन ( नऊवारी साडी ), स्थानिक संस्कृती इत्यादी गोष्टी या माध्यमातून आम्ही दाखविण्याचा प्रयत्न केला. एक जोडपे म्हणून आपला एकत्र राहून निसर्ग भ्रमंती आणि त्यातूनच करिअर करण्याचे भाग्य लाभले. आणि नंतर यात मुलगी अनघा देखील आमच्यात सामील झाले.
पण या प्रवासात पूर्वी माहित नसलेल्या काही गोष्टी नंतर स्पष्ट होत गेल्या . विशेषतः मागच्या तीन महिन्यात अभ्यासास बराच वेळ मिळाला. ज्या देशात आपण राहतो त्याला हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा लाभलीय त्यातून आयुष्याच्या विविध अंगांचा अभ्यास करून पूर्वजांनी जी कला निर्मिती , योग- अभ्यास , विज्ञान , देश रक्षण , आयुर्वेद प्रगती केली ती निसर्ग पाहत असताना आम्हाला ठिकठिकाणी दिसली . त्यामुळेच आपल्या देशाचे सौंदर्य सर्व प्रकारे उलगडण्याचा प्रयत्न अजून अभ्यासपूर्वक आम्ही नवीन प्रकल्पामार्फत करीत आहोत. आणि हा प्रकल्प नवीन नावाने आणि वेगळ्या स्वरूपात आम्ही तुमच्या सहकार्याने पुढे नेत आहोत. हे नवीन नाव असेल भारत ट्रेल्स .
आता आम्ही याला औपचारिक आकार देत आहोत. म्हणून ब्रँड नेम आवश्यक होते. अट अशी होती की नवीन ठिकाणे आणि क्रियाकलाप एक्सप्लोर करण्याच्या आमच्या आवडत्या क्रियासह देशाच्या आत्म्याचे प्रतिनिधित्व करणे. पुरातन काळापासून ते आत्तापर्यंतच्या सुसंगततेमुळे आम्ही मुद्दाम भारत हे नाव निवडले आहे. असे नाव जे उत्सव आणि भावनांची भावना दर्शविते (भावा + रता) किंवा प्राचीन राजा भारत पर्यंत ओळखली जाऊ शकते अशी संस्कृती.भाव - रत असलेला भारत जेथे प्रत्येक ऋतूत नवनवीन उत्सव असतात अशा देशाला शोधण्याचा प्रयत्न आम्ही ट्रेल्स, ट्रेक्स, रोड ट्रिप्स , फॅमिली हॉलिडेज , योग रेट्रीट्स / कॅम्पस , फोटोग्राफी वर्कशॉप्स यामार्फत तुमच्यासाठी करणार . सध्यातरी आपण हि सफर ऑनलाईन करू पण लवकरच प्रत्यक्षात भेटूयात.
आपल्या संस्कृतीचे आणि ऊर्जेचे प्रतीक असलेला सूर्य. त्यासोबत मांगल्याचा पितांबरी रंग जो सकाळच्या कोवळ्या उन्हाचे, मैत्री आणि चैत्र पालवीचे प्रतीक आहे तो नवीन लोगोत वापरला आहे. आमची खात्री आहे कि तुम्हालाही नवीन लोगो नक्कीच आवडेल. आपल्याकडे मुबलक प्रमाणात काय असेल तर सूर्य नारायण आणि त्याचा प्रकाश आणि त्यासोबत येणारी प्रसन्नता. आम्ही आमच्यासह आमच्या प्रवासातून ऊर्जा आणि आनंद तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. तुमच्यापैकी अनेकजण आमच्या सुरुवातीपासूनच आमच्या बरोबर आहेत . अनेकांनी आमच्या जंगल सफरीत सहभाग देखील घेतलाय त्या सर्वांना धन्यवाद. पुढेही तुमचा सहवास लाभेल अशी अपेक्षा .
Phone : 9740932248
Email : bharat.trails@gmail.com
Facebook : https://www.facebook.com/bharattrails/
Instagram : www.instagram.com/bharattrails
Twitter : @BharatTrails
コメント