• Yogesh Kardile

योद्धा




समाजाला योध्यांची गरज का पडते ? हा कदाचित आज आपल्यासाठी प्रश्न असू शकतो परंतु आजही जगभर त्यांनीच इतिहास घडविला आणि जगाचे नकाशे बदलले. ते चांगले कि वाईट याबद्दल दुमत असू शकते.

शांतता ही दोन युद्धांच्या मधला एक काळ असतो. आणि ती शांतता टिकवून ठेवण्यासाठी तीच शांतता वीरांचे बलिदान मागते. कुठल्याही सुंदर आणि सधन राष्ट्रावर परकीयांची नजर असणे स्वाभाविकच आहे. जी काही युद्धे झाली ती याचसाठी.

आजही सर्वात सक्षम राष्ट्रेच आपला देश संरक्षित ठेवू शकतात. निसर्गात जर पहिले तर जीवो जीवस्य जीवनम हाच नियम लागू आहे. दुर्दैवाने मानवाची भूक ही न संपणारी आहे.

योध्याला खरंच शांतता प्रिय नसते का ? त्याला भावना किंवा कुटुंब नसतात का ? किंबहुना त्याला तुमच्या आमच्या पेक्षा त्या थोड्या जास्तच असतील. मग तरीही तो हा मार्ग का निवडतो ?

एक योद्धा जो समाजाचे रक्षण करतो तर दुसरा आक्रमक जो इतरांची जमीन आणि संपत्ती हडप करतो ?

विचार करा छत्रपतींनी जर सर्वसंग परित्याग केला असता तर ? त्यांना राजकारण, अध्यात्म, समाज या सर्वांची जाणीव लहानपणापासूनच प्रगल्भ होती. मग स्वतःचे संपूर्ण आयुष्य आणि पुढच्या पिढ्या देखील संघर्षासाठी का खर्ची घातल्या ?

ते कोणाविरुद्ध लढले ? किती किल्ल्यांवर रक्ताचे शिंपण झाले असेल ? किती बांगड्या फुटल्या, मुले अनाथ झाली असतील ? घरे, शेती जाळली गेली, मंदिरे आणि मुर्त्या फोडल्या असतील ?

जेव्हा हे सर्व होताना जर प्रत्येक मावळ्याने विचार केला असता इतर लोक आहेत मी जर एकटा घरी राहिलो तर कुठे एव्हडा मोठा फरक पडतोय ? मग ही सेना उभी राहिलीच नसती.

ज्याचा अभिमान हा मराठमोळा समाज मिरवतोय तो विषय देखील आपल्या मनात आणि ओठात आला नसता.

जो शांततेचा संदेश देतो तो संन्यासी देखील योध्दाच असतो तर जो शांततेसाठी स्वतःचे बलिदान देतो तो योध्या देखील संन्यासीच. दोघेही स्वत्व या शरीरापलीकडे आहे हे उमगलेले आत्मे असतात.

आपण मात्र त्यांच्या बलिदानाची फळे चाखताना बेफिकिरीत जगतो. आजचे वर्तमान हे भूतकाळाची देणं आहे. तर आजचे कार्य उद्याचा येणार भविष्य ठरविणार आहे.

या विश्वात पृथ्वी हा एक ग्रह आणि असे अगणित ग्रह या ब्रह्मांडात जरी असले तरी या पृथ्वी वरील छोटीशी जमीन आपले सर्वस्व आहे.

आणि तिची प्राणपणाने रक्षा स्वतःसाठी आणि पुढच्या पिढीसाठी करणे हा आपला मानव धर्म आहे. गोष्ट इतकी सोपी आहे. मरहट्टा लवकरच आपल्यासमोर येत आहे फोटो स्टोरीच्या आणि व्हिडिओच्या रूपात ww.bharattrails.com या संकेतस्थळावर. copyrights reserved.

संकल्पना, छायाचित्र आणि लिखाण : योगेश कर्डीले

मॉडेल :आकाश आवटे

रिटचिंग : यतीन शिंदे

सहकार्य आणि प्रशिक्षण : shivajiraje_mardani_akhada, rudra_arts श्री. राकेश राव

.

2 views0 comments

Recent Posts

See All