top of page
  • Writer's pictureYogesh Kardile

DASHAVTAR | दशावतार



महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील एक अनोखी कला म्हणजे दशावतार. साधारणतः हिवाळा उन्हाळयाच्या दरम्यान गावोगावी कलाकारांचा संच संध्याकाळी जाऊन रात्री आपली कला गोष्टीरूपात सादर करतो. संगीत आणि भरजरी वेशभूषेची संगत लाभल्याने हा कार्यक्रम अतिशय मनोरंजक होतो.


विशेष म्हणजे प्रत्येक कलाकार मनापासून अभिनय करतो. आमच्या सुदैवाने समुद्र किनारी असलेल्या एका गावी हा कार्यक्रम साक्षात किनाऱ्यावरच पाहायला मिळाला. एखाद्या मोठ्या इमारती मधल्या सभागृहातील नाटक आणि खुल्या आकाशाखाली समुद्राच्या शेजारचा दशावताराचा कार्यक्रम यात मोठे अंतर निश्चितच आहे. संपूर्ण गाव जेव्हा हे नाटक पाहायला येतो तेव्हा सोबतच स्थानिक खानपानाची दुकाने देखील लागतात. एक छोटेखानी जत्राच तेथे भरते. अशा या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे आपल्यासाठी.


जर कधी तुम्ही कोकणात गेलात आणि एखाद्या गावी दशावतार असेल तर न चुकता जा आणि इतरांनाही प्रोत्साहित करा. समाजाला एकत्र करून आपल्या गोष्टी सांगण्याची हि हजारो वर्षांची परंपरा आजही या प्रांती जपली आहे. आपली संस्कृती आणि कला ही तिची सेवा करणाऱ्या कलाकारांना मदत करूनच वृद्धिंगत ( वाढते ) होते.











Words & images : Yogesh Kardile

All rights reserved.

11 views0 comments

Comments


bottom of page